Vasundhara Marathi Kavita | Marathi Kavita Collections

Vasundhara Marathi Kavita | Marathi Kavita Collections

 
 
 
वसुंधरा मराठी कविता | वसुंधरा दिवस | vasundhara divas kavita
 earth day special marathi kavita

कवितेबद्दल-

मराठी कविता वसुंधरा  या कवितेच्या माध्यमातून वसुंधरा (Vasundhra ) मानवाशी संवाद साधत आहे आणि ती पुर्ण पणे भावना विवश होऊन मानवाला तिची व्यथा सांगत आहे.

या कवितेचा आशय हा प्रदूषणामुळे,उत्खननामुळे, वृक्ष तोडीमुळे जो काही वसुंधरेचा ऱ्हास होत आहे त्याबद्दल वसुंधरा आपली खंत व्यक्त करत आहे. तसेच मानवाला काही आदेश देत आहे.
 
 
 
 

वसुंधरा मराठी कविता

 
अरे मानवां बसं कर आता
भेगाळते रे माझे हे क्षीण झालेले शरीर
थकली आहे रे मी बसं कर आता… 
 
माहीत आहे रे तु किती हुशार, प्रगल्भ आहेस ते ! 
मी नाही रे ललकारत तुला
थकली आहे रे मी बसं कर आता…
 
तुझ्या इच्छा पुर्ण करता करता मीच उघडी पडत चालली आहे… 
मायेच्या ओझ्याखाली मी पार दबली आहे… 
या वयात हिरवा शालू नेसण्यांऐवजी ठिगळं पडलेलं पातळ नेसली आहे… 
थकली आहे रे मी बसं कर आता…
 
माझं तुझ्याकडे एकचं आहे रे मागणं पुर्ण करशील काय ? 
मोकळा श्वास हवायं रे मला आणि माझ्या लेकरांना देऊ शकशील काय… 
रोज घेऊन जातोय मला आणि स्वतःला मृत्युच्या दारापाशी… 
आणि विजय झाला म्हणून जयजयकार करतोय इहलोकांपाशी… 
थकली आहे रे मी बसं कर आता…
 
मला पुन्हा नव्याने जगायचं आहे रे
आठवं ते दिवस जेव्हा तु पहिलं पाऊल अलगदपणे माझ्या अंगावर ठेवलं… 
किती आनंदाने मी तुला माझ्या अंगाखांद्यावर खेळवलं… 
माझ्या कुशीत तु गाढ झोपायचा…  
उन्हं, वारा नं लागो म्हणून अंगावर मायेची शाल ओढायचा… 
 
तु विसरला असशील पण मी नाही रे विसरले  ! 
नव्याने येणारी लेकरे मला साद घालतायेतं… 
मायेच्या पदरात यायला आशेने पाहतायेतं… 
येणाऱ्या या पिढीला मला पुन्हा नव्याने पोसायचयं… 
त्यासाठी मला पुन्हा नव्याने जगायचंय… 
म्हणून बसं कर आता…. 
थकली आहे रे मी बसं कर आता…
 
– कोमल जगताप
 
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top