Vijayadashami Marathi Kavita | दसरा मराठी कविता

Vijayadashami Marathi Kavita | दसरा मराठी कविता

 
 
 
Vijayadashami Marathi Kavita | विजयादशमी कविता मराठी  | दसरा मराठी कविता
 

विजयादशमी कविता मराठी

माझ्यामध्ये राम
माझ्यामध्ये रावण
रामाचा करू अंगीकार
करू रावणाचा नायनाट
अंगीकारू रामवृत्ती
झिडकारून रावणवृत्ती
तेव्हाच खरी साजरी
होईल विजयाची दशमी
विजयादशमीच्या दिवशी
होतो राम विजयी
वाईट वृत्तीचा होतो विनाश
आज विजयादशमी दिवशी
रामाचे आम्ही भक्त
म्हणजे सत्याचे अनुयायी
कपटी रावणवृत्तीला
आम्हा जवळ थारा नाही
विजयादशमी दिवशी
आम्ही देतो आपणास शुभेच्छा
रावणवृत्ती नष्ट होवो
हीच आमची सदिच्छा…
विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा….. 
              – कोमल जगताप
Vijayadashami Marathi Kavita | विजयादशमी कविता मराठी  | दसरा मराठी कविता

दसरा कविता मराठी

आज बाई दसरा
किती करते बाई नखरा…
सजावट झाली
घर सुशोभित झाले…
झेंडूच्या फुलांनी
आहे नवीन बहर आला…
रांगोळीचा बाई
थाट आहे जरा वेगळा…
सरस्वती माई आहे
पुजली आम्ही घरा …
लोखंडी अवजारे
आम्ही धुतो खळाखळा …
सोने लुटायला जातो
सोडूनि गावच्या वेसा…
आनंदाने एकमेकांस
सोने आम्ही देतो …
गोडधोडाला पुरणपोळीचा
नैवेद्य आम्ही करितो…
अशा प्रकारे आम्ही
दसरा साजरा करितो …
 
       – कोमल जगताप
***** माझ्या प्रिय वाचकांना दसऱ्याच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा  *****

कवितेबद्दल – 

 
मराठी कविता विजयादशमी ही कविता विजयादशमी म्हणजे दसऱ्यावर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून विजयादशमी चे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
 
विजयादशमी हा हिंदूचा महत्त्वाचा सण मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी प्रभु रामचंद्र यांनी रावणाचा वध केला होता म्हणून विजयादशमी हा सण साजरा केला जातो.
तर दुसऱ्या दसरा मराठी कवितेच्या माध्यमातून गावाकडील दसरा सण कशा प्रकारे साजरा केला जातो हे अधोरेखित केले आहे.

अजून मराठी कविता वाचा  :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top