” रक्षाबंधन ” मराठी कविता
एक धागा तुझ्यासाठी
एक धागा माझ्यासाठी
या धाग्याचे मोल आहे
तुझ्या माझ्या रक्षणासाठी
बांधीला मी हा धागा
तुझ्या या कलायीवरती
तु ही बांध हा धागा
माझ्या या कलायीवरती
मी ही करील रक्षण तुझे
माझ्या भाऊराया
परंतु एक सांगणे
कधी डावलु नको या बहिणीची काया
तिचे ढोर नको घेऊनी फिरू
तुझ्या हाती
तिलाही होऊ दे सक्षम
भिडूदे या संसाराच्या माथी
रक्षणाची शपथ
नको घेऊ रे तु एकटा
साऱ्या जगताची माता होऊ दे सक्षम
करील सर्वांच्या एकचं वाटा
– कोमल जगताप
कवितेबद्दल :
मराठी कविता रक्षाबंधन ही कविता रक्षाबंधन या सणावर आधारित आहे परंतु या कवितेचा उददे्श मात्र वेगळा आहे.
मराठी कविता रक्षाबंधन या कवितेमध्ये मुलींना व मुलांना सक्षम बनविण्यासाठी आपल्या घराघरांमधुन समानतेचे योग्य शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
नव-पिढीला जर योग्य शिक्षण मिळाले तर नक्कीच ते स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतात आणि एकमेकांना साहाय्य करत आनंदाने एक सुंदर जग निर्माण करू शकतात. त्यासाठी त्याच्यामध्ये समानतेचे वारे वाहणे गरजेचे आहे.
मराठी कविता रक्षाबंधन या कवितेच्या माध्यमातून आपण नवीन कल्पनाचे स्वागत केले पाहिजे तसेच नव्या विचाराने जोमाने जगले पाहिजे. याच आशयाने या कवितेचे लेखन केले गेले आहे.
मराठी कविता रक्षाबंधन ही कविता आपणास आवडेल ही आशा…