Marathi Kavita Aaste Kashi?

Marathi Kavita Aaste Kashi?

कविता असते कशी ? 

कविता असते,
आगीतून उठलेली
ती पेटती ठिणगी…
कविता असते,
शांत मनाला घातलेली
कुणी तरी मागणी…
कविता असते,
लाजरी, हसरी, गोजरी
लावण्यवतीने नेसलेली
नेसुचि लुगडी…
कविता असते,
बोलकी, अल्लादतेने
थोपटणारी आज्यांची मायेची
उबदार घोंगडी…
कविता असते,
शांत मनाला चिरणारी…
कविता असते,
विद्रोहाचा बांध फोडणारी…
कविता असते,
कुणाची तरी मैत्रीण…
कविता असते,
रिमझिम पडणारा
अंगणातला पाऊस…
कविता असते,
कुणाची तरी आठवण…
नि कविता असते,
एकांतात केलेली
खुप गोष्टींची साठवण…
प्रत्येकाची कविता
प्रत्येकांनुसार बदलते…
कुणाला आनंदात सुचते,
कुणाला विरहात सुचते,
कुणाला कलहात सुचते,
तर कधी कुणाला रात्रीच्या चांदण्यात
कविता सुचते…
आभाळात बघताना
अचानक दिसावा तुटलेला
तो सुंदर तारा…
तसा शब्दांनी बहरलेला
गुलमोहर अचानक समोर यावा…
   – कोमल जगताप

कवितेबद्दल  – 

कविता असते कशी ही कविता कवितेबद्दल आपुलकी, जिव्हाळा, प्रेम व्यक्त करत आहे. या कवितेच्या माध्यमातून मराठी कवितांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
कविता हा प्रत्येकासाठी फार जिव्हाळ्याचा विषय असतो. कवितेच्या माध्यमातून कवी/कवयित्री एखाद्या गोष्टीबद्दल रस निर्माण करत असतात.
कविता म्हणजे कवीने साकारलेल्या कल्पनाचा, वास्तवाचा एक अद्भुत नमुना असतो. कवितेमध्ये शब्दांच्या शृंखल्याचा अद्भुत आविष्कार असतो.
कविता म्हणजे ” दोन व्यक्तींना किंवा समाजाला जोडणारा एकमेव दुवा “. कवितेमध्ये शब्दाची अफाट ताकद असते.
कविता कशी लिहावी ?  या प्रश्नाच्या उत्तरासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top