Poems on marriage in Marathi | लग्न मराठी कविता | Marathi Kavita lagna

Poems on marriage in Marathi | लग्न मराठी कविता | Marathi Kavita lagna

Poems on marriage in Marathi | लग्न मराठी कविता | Marathi Kavita lagna | lagna kavita | marriage poem marathi
 लग्न मराठी कविता

लग्न मराठी कविता

लग्न म्हणजे काय ? 
लग्न म्हणजे कुणाचा तरी विश्वास… 
लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ… 
लग्न म्हणजे हळुवार घातलेली कुणाला तरी साद… 
होय लग्न म्हणजे मैत्रीही… 
लग्न म्हणजे खंट्याळपणा, गोडवा आणि निसर्गाशी जोडणारा एकमेव दुवा… 
लग्न मराठी कविता

दोन माणसे जवळ येतात… 
दोन कुटुंबे जोडली जातात… 
दोन माणसे एक होतात… 
दोन कुटुंबे आपली होतात… 
रेशीमगाठ बांधली जाते
दोन जीवांची… 
रेशीमगाठ बांधली जाते
उभ्या संसाराची… 
रेशीमगाठ बांधली जाते
उद्याच्या भविष्याची… 
आणि रेशीमगाठ बांधली जाते
दोन जीवांच्या विश्वासाची… 
सुख, दु:खात साथ देईल
दोन जीव वचनबद्ध होतात… 
एकमेकांच्या आनंद जपण्यासाठी
आयुष्य सारं खर्ची करतात… 
सातफेरे घेत लग्न पुर्णत्वास नेतात… 
एकमेकांना आधार देण्याचा
आयुष्यभर प्रयास करतात… 
आयुष्य सारं साथ सोबतीनं
घालवण्यासाठी थोर मोठ्याचा 
आर्शिवाद घेतात… 
आणि शेवटी दोन जीव एकाच 
घरटयात रहायला येतात… 
चिमणा आणि चिमणीच्या प्रवासाला
होते इथूनच सुरूवात… 
जेव्हा होते लग्न जेव्हा जुळते
रेशीमगाठ… 

Poems on marriage in Marathi | लग्न मराठी कविता | Marathi Kavita lagna | lagna kavita | marriage poem marathi
 लग्न मराठी कविता

रेशीमगाठ मराठी कविता

रेशीमगाठ बांधण्याआधी 
मला वचन दे… !!!
आयुष्याच्या वळणावर 
हात माझा सोडणार नाही… !!! 
अंधाराला भिऊन तु कधी 
मागे वळणार नाही… !!! 
काळोख जरी दाटून आला 
या नभी… !!! 
तुझी माझी रेशीमगाठ 
कधी तुटणार नाही… !!! 
तुझ्या माझ्या नात्याला आधार आहे 
फक्त विश्वासाचा… !!! 
हा विश्वासचं असेल माझ्यासाठी 
खुप खुप मोलाचा… !!! 

वचनबद्ध मराठी कविता

आयुष्याच्या वाटेवर चालताना 
मला कोणीतरी एक सखी हवी… 
तिच्या सोबत चालताना 
प्रवास खुप सोपा होईल… 
रोज रोज स्वप्नामध्ये 
मी तिचा हात हाती घेतो… 
आणि आयुष्यभर वचनबद्ध राहण्याचे 
मी तिला वचन देतो… 
मराठी लग्न  कविता आपणास कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप मोलाच्या आहेत. 

तुम्हाला एखाद्या विषयावर मराठी कविता हवी असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही आपली पुर्तता करण्याचा नक्की प्रयत्न करू. 

आपण मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाइटला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *