Sad Poem in Marathi | आता वाटते भिती | Bheeti Kavita

Sad Poem in Marathi | आता वाटते भिती | Bheeti Kavita

sad poem in marathi | sad kavita in marathi
 sad poem in marathi कवितेबद्दल


आता वाटते भिती (sad poem in marathi) ही कविता माणसांमधली माणूसकी हरवून गेल्याची याचना करत पूर्णत्वास गेली आहे. 

माणसाला माणसाचीच भिती आणि त्यामुळे हरवतं चाललेली माणुसकी अधोरेखित करण्यात आली आहे. 


sad poem in marathi | sad kavita in marathi
 sad poem in marathi 
आता वाटते भिती ! 


आता वाटते भिती
या जिवनांत जगण्याची

आता वाटते भिती
कुणावर विश्वास ठेवण्याची

आता वाटते भिती
माणूस म्हणून या जिवघेण्यां-जगण्याची

आता वाटते भिती
माणसाला माणूस म्हणून ओळखून घेण्याचीकसा बनला हा माणूस
गिळायं  लागलाय माणसाला माणूस

आता माणसांवर
विश्वास ठेवण्याची वाटते मला भिती

आता माणूस म्हणून
जगण्याची वाटते मला भिती

पैशाने या जगाला
पार केले आंधळे

पैशाने बनविले हैवान
की माणसाने बनविले स्व:ताला हैवान

कोण आहे आपला
कोण आहे परका

भडकलायं पैशाचां भडका
माणसाने बांधले स्व:ताला पैशांच्या तिरडीवर

होरपळते काळीज
जळते हे शरीर

होते कासावीस 
बघूनी हा जीवघेणा हल्ला

कसे ठेवायचे स्व:ताला शाबूत
या जीवघेण्या हल्ल्याला कसे द्यायचे उत्तर

कशी शोधू माझ्या जगण्याची वाट
जी हरवलिये या जीवघेण्या गद्दी॑त … 

                             -कोमल जगताप


अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या –Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *